Ajit Pawar : मंत्री कोकाटेंवर दादा नाराज, राजीनाम्याचा सोमवारी फैसला? कारवाईबाबत अजित पवारांचे संकेत काय?
माणिकराव कोकाटे यांच्यावर अजित पवार नाराज असून त्यांनी कारवाईचे संकेत दिलेत. माणिकराव कोकाटे यांच्याशी सोमवारी चर्चा करेल असा अजित पवार यांनी म्हटलं. सरकारची प्रतिमा मलीन होऊ नये ही सर्वांचीच जबाबदारी आहे असा अजित पवार यांनी म्हटलं आहे.
राज्याच्या राजकारणात एक नवीन वाद निर्माण झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना कठोर इशारा दिला आहे. अजित पवार यांच्या या वक्तव्यामुळे कोकाटे यांचे मंत्रिपद धोक्यात आले आहे. पवार यांनी स्पष्ट केले की, कोकाटे यांच्या काही वक्तव्यांमुळे सरकारची प्रतिमा मलीन होत असून ते सहन केले जाणार नाही.
माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदावर सोमवारी फैसला होणार असे संकेत अजित पवार यांनी दिले. याआधी कोकाटेंना दोन वेळा इशारा दिल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. दादांच्या वक्तव्यावरून कोकाटेंच्या मंत्रिपदावर टांगती तलवार असल्याचं स्पष्ट झाले. दरम्यान ‘शेतकऱ्यांकडनं एक रुपया शासन घेतलं शेतकऱ्यांना एक रुपया देत नाही आम्ही शेतकऱ्यांकडनं एक रुपया शासन म्हणजे भिकारी कोणी शासन आहे शेतकरी नाही, असं वादग्रस्त वक्तव्य कोकाटे यांनी केलं होतं. या वक्तव्यावरून अजित पवार कृषीमंत्री कोकाटे यांच्यावर नाराज असल्याचं दिसतंय. कृषीमंत्री असो किंवा कुणीही भान ठेवून बोलावं, अशा सूचना कोकाटे यांना दिल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

