RSS Organizer On BJP : अजितदादांमुळे भाजपची ब्रँड व्हॅल्यू घटली? संघाच्या मुखपत्रातून BJP ला खडेबोल
संघाचं मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरमधून भाजपला खडेबोल सुनावले आहेत. पक्ष फोडाफोडीचा कोणताही फटका बसला नसल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणत असले तरी भाजपची मातृसंस्था असलेल्या संघाच्या मुखपत्रातून भाजपच्याच कार्यपद्धतीला चपराक लगावली आहे. बघा व्हिडीओ
संघाचं मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरमधून भाजपला खडेबोल सुनावले आहेत. अजित पवार यांना घेण्याची गरज काय होती. अजितदादांमुळे भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाल्याचं संघाचं मुखपत्रानं म्हटलं आहे. पक्ष फोडाफोडीचा कोणताही फटका बसला नसल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणत असले तरी भाजपची मातृसंस्था असलेल्या संघाच्या मुखपत्रातून भाजपच्याच कार्यपद्धतीला चपराक लगावली आहे. अजित पवारांना सोबत घेवून भाजपने स्वतःची किमंत कमी करून घेतली. अनेक वर्ष विरोधात लढलेल्या काँग्रेस नेत्यांना फक्त सत्तेसाठी प्रवेश दिला. पुरेसं बहुमत असतानाही अजित पवारांना सोबत का घेतलं गेलं? असे अनेक मुद्दे संघाचं मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरमधून उपस्थित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे शिंदे गटाला सोबत घेतल्यानंतर नेमकं हेच मत विरोधीपक्ष असलेल्या अजित पवार यांनी मांडलं होतं आणि आज तेच मत भाजपने अजित पवारांना सोबत का घेतलं? यावरून संघाच्या मुखपत्रातून मांडलं जात आहे. बघा त्यावेळी अजित पवार काय म्हणाले होते?