AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar : कर्जमाफीवरून अजित पवारांचा यु-टर्न, दादांचं तळ्यात मळ्यात, एकदा म्हणताय करू अन् आता...

Ajit Pawar : कर्जमाफीवरून अजित पवारांचा यु-टर्न, दादांचं तळ्यात मळ्यात, एकदा म्हणताय करू अन् आता…

| Updated on: Aug 22, 2025 | 5:56 PM
Share

अहिल्यानगरमध्ये कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्यांना आत्महत्या केलीये. कर्जमाफीची वाट पाहत होतो पण आता आत्मविश्वास संपलेला आहे असा हा शेतकरी व्हिडीओमध्ये म्हणताना दिसतोय.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून अजित पवारांनी युटर्न घेतलाय. राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यामधल्या कर्जमाफीचा आश्वासन नाही असं म्हणणारे अजित पवार आता कर्जमाफी योग्य वेळी करू असं म्हणतायत. ‘देण्याच्या संदर्भात नाही म्हटलेलंच नाही. लगेच देऊ असं म्हटलेलं नव्हतं. माझं एक उदाहरण दाखवा…एकच मिनिट वाद घालू नका… मला जाहीरनामा दाखवा’, असं वक्तव्य अजित पवार यांनी मे २०२५ रोजी केलं होतं. मात्र या वक्तव्यावरून अजित दादांनी युटर्न घेतल्याचे दिसतंय. दरम्यान, ‘योग्य वेळ आल्यावर कर्जमाफीची घोषणा करणार…जाहीरनाम्यामध्ये ते होतं… राज्यकारभार करत असताना सगळ्या गोष्टीचा विचार करून पुढे पाऊल उचलायचे असतात’, असं आता अजित पवार म्हणताय.

एकीकडे शेतकरी कर्जमाफीची चर्चा सुरू असताना दुसरीकडे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना कर्जबाजारीपणातून आत्महत्या केली. नेवासा तालुक्यामधल्या बाबासाहेब सरोदे यांनी आत्महत्येपूर्वी एक व्हिडीओ सुद्धा चित्रित केलाय. आज ना उद्या कर्जमाफी होईल ही आशा होती. सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे कर्जमाफी केली नाही. योग्य वेळी मदत झाली असती तर जगलो असतो पण आता आत्मविश्वास संपलेला आहे. कर्जबाजारी शेतकरी म्हणून पिळवणूक होते या जगात पैशांशिवाय काहीच होत नाही. जीवंतपणी मदत झाली नाही मी मेल्यावर इतर शेतकऱ्यांना तरी मदत करा. असं बाबासाहेब सरोदे व्हिडीओमध्ये म्हणतायत.

Published on: Aug 22, 2025 05:56 PM