MNS Banner : हिंदीच्या मुद्यावरून लावलेल्या बॅनरवर अजितदादांचा फोटो, नेमकं काय म्हटलंय? ज्याची होतेय चर्चा
हिंदीच्या मुद्द्यावरून लावलेल्या मनसेच्या बॅनरवर अजित पवारांचा फोटो आहे. इतकंच नाहीतर हिंदीच्या मुद्द्यावरून अजित पवार यांनी घेतलेली भूमिका मनसेने बॅनरच्या माध्यमातून मांडण्यात आली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसेकडून लावण्यात आलेल्या बॅनरवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा फोटो असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईतील दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कात मनसेच्या बॅनरवर अजित दादांचा फोटो लावण्यात आला आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. अजित पवारांनी काही दिवसांपूर्वी पहिलीपासून मराठी भाषेची सक्ती नको, पाचवीपासून हिंदी भाषा असायला पाहिजे, असं वक्तव्य केलं होतं. त्या वक्तव्याचा हवाला देत या बॅनरच्या माध्यमातून सरकारवर मनसेकडून टीका करण्यात आल्याचे दिसतेय. मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांनी लावलेल्या बॅनरची सध्या जोरदार चर्चा दादरमध्ये सुरू आहे. सरकारमधील उपमुख्यमंत्री मराठी भाषा सक्ती नको असं म्हणत आहेत पण सरकार ऐकत नाही, असा संदेश या बॅनरमधून देण्याचा प्रयत्न मनसेचा असल्याचे दिसतंय.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?

