संजय राऊत यांची मानसिकता विकृत, देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
राऊतांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचा एक फोटो शेअर करत त्यांच्यावर गंभीर आरोप केलेत. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, संजय राऊत यांची विकृत मानसिकता त्यातून झळकतेय. ते किती हताश झाले आहेत, हे त्यांनी ट्वीट केलेल्या कृतीतून दिसतेय.
मुंबई, २० नोव्हेंबर २०२३ : राऊतांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचा एक फोटो शेअर करत त्यांच्यावर गंभीर आरोप केलेत. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, संजय राऊत यांची विकृत मानसिकता त्यातून झळकतेय. ते किती हताश झाले आहेत, हे त्यांनी ट्वीट केलेल्या कृतीतून दिसतेय. चंद्रशेखर बावनकुळे हे त्यांच्या कुटुंबासोबत मकाऊमधील त्या हॉटेलमध्ये थांबले होते. जिथे बावनकुळे जेवले त्या रेस्टॉरंटच्या बाजूलाच कॅसिनो आहे. ते एकत्रितच आहेत. जाणीवपूर्वक तो फोटो ट्वीट करण्यात आलाय. जर पूर्ण फोटो ट्वीट केला असता तर त्यांच्यासोबत कोण आहेत, हे दिसले असते. त्यामुळे संजय राऊत यांच्यासारखी विकृत मानसिकता संपवली पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले तर इतकी निराशा बरी नाही, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना खोचक टोलाही लगावला आहे.





