देवेंद्र फडणवीसांवर विधानसभेसाठी मोठी जबाबदारी, भाजपकडून ‘हे’ अधिकार सोपवले
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या वर्षाच्या अखेरीस राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी मित्रपक्षांसोबत जागावाटपाचा निर्णय घेणार असल्याचे भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. येत्या काही महिन्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुका सुरळीत पार पडाव्या, या हेतूने हे पाऊल उचलल्याचे भाजपकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, भाजपकडून विधानसभेसाठी देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे
विधानसभेसाठी भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विधानसभेसाठी भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांना जागा निश्चितीचे अधिकार देण्यात आले असल्याची माहितीदेखील सूत्रांकडून मिळत आहे. तर मित्रपक्षांना किती जागा द्यायच्या याचे अधिकारही भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आल्याचे सूत्रांकडून समजत आहे. रविवारी भाजपच्या कोअर कमिटीची एक बैठक पार पडली. या कोअर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे. भाजपने घेतलेल्या निर्णयानंतर आता महायुतीत भाजपने किती जागा लढवायच्या याचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांना घेता येणार आहे. यासोबत मित्रपक्षांना किती जागा द्यायच्या हे ठरवण्याचे सर्वाधिकार देवेंद्र फडणवीसांना सोपवले आहे. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी लवकरच भाजपची यादी जाहीर केली जाणार आहे. तर मित्र पक्षांचा योग्य आदर राखला जाईल, असं एकमत बैठकीत झालं आहे. तर भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही, अशी भूमिका भाजप वरिष्ठांनी घेतली आहे.