आरक्षणावरून पुन्हा जरांगे vs भुजबळ; जरांगे मुख्यमंत्री झाले तरी आरक्षण मिळणार नाही, भाजप नेत्याचा हल्लाबोल

पुण्यात मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली पार पडली. त्यांचं मराठ्यांकडून जंगी स्वागत करण्यात आलं यावेळी पुन्हा सरकारला सुपडा साफ करण्याचा इशारा जरांगेंनी दिला. मराठ्यांच्या कुणबी नोंदींवरून सगेसोयऱ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. मात्र जरांगे मुख्यमंत्री झाले तरी आरक्षण मिळणार नाही, असं भाजपचे खासदार अनिल बोंडे म्हणाले.

आरक्षणावरून पुन्हा जरांगे vs भुजबळ; जरांगे मुख्यमंत्री झाले तरी आरक्षण मिळणार नाही, भाजप नेत्याचा हल्लाबोल
| Updated on: Aug 12, 2024 | 10:55 AM

आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात जुंपली आहे. छगन भुजबळांनी पुन्हा आपल्या ओबीसी एल्गार सभा सुरू केल्या असून ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळणार नाहीच, असं सांगलीतील सभेतून छगन भुजभळ म्हणालेत. यालाच पलटवार म्हणून जरांगेंनी सुपडा साफ करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, मंत्री छगन भुजबळ, सरकराच नाहीतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना देखील मनोज जरांगे पाटील यांनी बजावलं आहे. महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही म्हणणाऱ्या मराठ्यांची ताकद काय यावेळी हे दिसेल, असं जरांगे पाटील म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांच्या पुन्हा संपूर्ण महाराष्ट्र भर सभा सुरू झाल्यात. तर भुजबळांनी देखील एल्गार पुकारत सभा घेणं सुरू केलंय. ज्यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांनी सगेसोयरेंना विरोध दर्शवत ते टिकणारच नाही, असे म्हटलंय तर जरांगेंकडून धूळ फेक सुरू असल्याचेही म्हणत पडळकरांनी त्यांच्यावर हल्लाबोल केलाय.

Follow us
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर.
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य.
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'.
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'.
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?.
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड.
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा.
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी.
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक.
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद.