भारताची चांद्रयान ३ मोहीम यशस्वी; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

भारताची चांद्रयान ३ मोहीम यशस्वी; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

Harshada Shinkar | Updated on: Aug 23, 2023 | 9:47 PM

VIDEO | भारताच्या चंद्रयान ३ मोहीमेच्या यशस्वी लँडिंगनंतर संपूर्ण देशभरात जल्लोष, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त करत दिली प्रतिक्रिया म्हणाले...'आजचा दिवस हा जगाच्या इतिहासातला भारताचा दिवस म्हणून गणला जाईल'

जपान, २३ ऑगस्ट २०२३ | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील नव्या भारताने एक नवा विक्रम केला आहे. इस्त्रोच्या वैज्ञानिकांनी चांगलं यांचं सेफ लँडिंग केला आहे आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपल्या चंद्रयान उतरवणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. आजचा दिवस हा जगाच्या इतिहासातला भारताचा दिवस म्हणून गणला जाईल. आज मोदींनी ज्या प्रकारे इस्त्रो व वैज्ञानिकांना प्रोत्साहन दिलं आहे, त्यामुळे नव्या भारताचे नवस्वरूप आम्हाला पाहायला मिळत आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्त्रोच्या सर्व वैज्ञानिकांचं आणि टीम चंद्रयानचं मनापासून अभिनंदन करतो, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. पुढे ते असेही म्हणाले, हा ऐतिहासिक क्षण मला जपानच्या टोकियोच्या भारतीय दूतावासामध्ये भारतीयांसोबत अनुभवायला मिळाला आणि त्यांच्यासोबत मला मिशन चंद्रयान पाहता आलं याचा आनंद आहे. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि उत्साह हा माझा हा सुद्धा आनंद व उत्साह वाढवणारा होता.

Published on: Aug 23, 2023 09:47 PM
Follow Us