DCM Eknath Shinde : तुला पुढे काय शिकण्याची इच्छा आहे?, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवी देशमुखला फोन
Eknath Shinde Calls Vaibhavi Deshmukh : बीडचे माजी सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुखला बारावीत 85.33 टक्के मिळाले आहेत. त्यानंतर तिच्या अभिनंदनासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फोन केला.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता १२ वी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. या परीक्षेत बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिने बारावीच्या परीक्षेत ८५.११ टक्के गुणे मिळवले आहेत. वैभवीने निकालापूर्वी आज माझे वडील माझ्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी नाहीत, याचे मला दुःख आहे, अशी भावूक प्रतिक्रिया दिली होती. दरम्यान, निकल जाहीर झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैभवीला फोन करून उत्तीर्ण झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.
Published on: May 05, 2025 06:16 PM
Latest Videos
संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांकडून मोठी अपडेट, कराडसह आरोपींवर..
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्...
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा
...तोपर्यंत घाई नको, मनसे-ठाकरे सेनेच्या युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका

