Eknath Shinde : एकनाथ शिंदेंकडून संजय गायकवाडांची कानउघडणी? शिंदेंची मोठी प्रतिक्रिया
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार संजय गायकवाड यांच्या आमदार निवासातील मारहाण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये निकृष्ट दर्जाचे जेवण मिळाल्याने कर्मचाऱ्याला मारहाण केल्याच्या घटनेमुळे राजकीय वातावरण तापले आहे. विधान परिषदेत यावर चर्चा होताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गायकवाड यांच्या कृतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत सभागृहाच्या अध्यक्षांना कारवाईचा निर्णय घेण्याची विनंती केली. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही गायकवाड यांना समज दिल्याचे सांगितले आहे.
शिंदे म्हणाले, निकृष्ट जेवणामुळे कोणालाही त्रास होऊ शकतो. गायकवाड यांना खराब जेवणामुळे उलटी झाली आणि रागाच्या भरात त्यांनी कर्मचाऱ्याला मारहाण केली. पण आमदार हे लोकप्रतिनिधी असतात. त्यांना कायदेशीर मार्गाने कारवाई करण्याचा अधिकार आहे. अशा प्रकारे मारहाण करणे अयोग्य आहे. मी स्वतः गायकवाड यांना याबाबत समज दिली आहे.
दरम्यान, पुढे बोलताना शिंदे यांनी विरोधकांवरही टीका केली. ते म्हणाले, विरोधक रोज विविध मुद्द्यांवर बोलतात. आम्ही त्यांना सभागृहात बोलण्याची संधी देतो आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यास तयार असतो. पण त्यांना सभागृहाबाहेर बोलण्यातच जास्त रस आहे. कोणत्याही पक्षाचा लोकप्रतिनिधी असो, त्याने आपली जबाबदारी समजून आणि कर्तव्याचे भान ठेवून वागले पाहिजे.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?

