Ghanshyam Darode : …नाहीतर 10 दिवसांत आत्महत्या करेन, हार घातलेल्या फोटोवरून छोटा पुढारी संतापला अन्…
सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून स्वतःच्या निधनाच्या व्हायरल होणाऱ्या पोस्ट पाहून घनःश्याम दरोडे चांगलाच संतापला आणि त्यानं थेट श्रीगोंदा पोलीस ठाणं गाठलं आणि पोलिसांनाच थेट इशारा दिल्याचे पाहायला मिळत आहे.
बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात ‘छोटा पुढारी’ म्हणजेच, घनःश्याम दरोडेला मोठी प्रसिद्धी मिळाली. तेव्हापासूनच घनःश्याम सोशल मीडियावर चांगलाच अॅक्टिव्ह झालाय. घनःश्याम स्वतःचे फोटो, हटके स्टाईल व्हिडीओ नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असतो. मात्र अशातच गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर छोटा पुढारी घनःश्याम दरोडेचं निधन झाल्याच्या काही पोस्ट व्हायरल होत आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अशातच आता स्वतः घनःश्याम दरोडे यांनं यासंदर्भात श्रीगोंदा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. नुसती तक्रारच नाहीतर पोलिसांना कठोर पावलं उचलण्याची विनंतीही त्यानं केली आहे. घनःश्याम दरोडेनं पोलिसांना येत्या 10 दिवसांत अफवा पसरवण्या ट्रोलर्सवर कारवाई करा, नाहीतर मी 10 दिवसांत आत्महत्या करीन असा थेट इशारा पोलिसांना दिल्याचे समोर आले आहे.
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं

