आमचा मुद्दा तत्त्वाचा, उद्धव साहेबांबद्दल आजही तेवढंच प्रेम, आदर- दीपक केसरकर

"दोन दिवस अगोदरपर्यंत उद्धव साहेबांना खुली ऑफर दिली होती, मी खुलं पत्र लिहिलं होतं. अजूनसुद्धा तुम्ही महाविकास आघाडीची साथ सोडा, आम्ही तुमच्याशी बोलायला येतो. परंतु शेवटपर्यंत त्यांनी ती साथ सोडली नाही," असं केसरकर म्हणाले.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

Jun 30, 2022 | 3:00 PM

“दोन दिवस अगोदरपर्यंत उद्धव साहेबांना खुली ऑफर दिली होती, मी खुलं पत्र लिहिलं होतं. अजूनसुद्धा तुम्ही महाविकास आघाडीची साथ सोडा, आम्ही तुमच्याशी बोलायला येतो. परंतु शेवटपर्यंत त्यांनी ती साथ सोडली नाही. सुप्रीम कोर्टाचा निकाल ज्यावेळी विरोधात लागला, त्यावेळी हे सर्व घडून आलं. त्यामुळे कोणीही उद्धव साहेबांच्या विरोधात गेलं, त्यांच्याविरोधात बंडखोरी केली, असं बिलकूल घडलेलं नाही. उद्धव साहेबांबद्दल आम्हाला याआधी जेवढं प्रेम आणि आदर होतं, तेवढं आजही आहे. आमचा मुद्दा हा तत्त्वाच आहे आणि हे करत असताना आम्ही शेवटची मुदत दिली होती. ती मुदत दिल्यानंतर आम्ही पुढचे निर्णय घेतले आहेत,” असं दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें