Operation Sindoor : जेवढ्या वेळात लोकं नाश्ता करतात, तेवढ्याच वेळात पाकिस्तानला निपटवलं, राजनाथ सिंह यांच्याकडून भारतीय सैन्याचं कौतुक
'भारत केवळ परदेशातून निर्यात होणाऱ्या शस्त्रांवर अवलंबून नाही. आपल्या देशात बनवलेली शस्त्रे देखील अचूक आणि अभेद्य आहेत. पाकिस्तानने स्वतः ब्राह्मोस क्षेपणास्त्राची ताकद मान्य केली आहे.', असंही राजनाथ सिंह म्हणाले.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज शुक्रवारी भुज एअरबेसवरील सैनिकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सैन्याने केलेल्या कामगिरीचं तोंडभरून कौतुक केले. यासह पाकिस्तानवर चांगलंच टीकास्त्र डागलं. पहलगाम हल्ल्यानंतर भारताकडून करण्यात आलेल्या पलटवाराच्या कारवाईनंतर ऑपरेशन सिंदूरचं जगात कौतुक केले जात असल्याचे दिसतेय. अशातच मंत्री राजनाथ सिंह भुज एअरबेसवर बोलताना म्हणाले, भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेचे सर्वत्र कौतुक होत आहे आणि डीआरडीओने विकसित केलेल्या यंत्रणेने त्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अनेक ठिकाणी, आपले नागरिक पाकिस्तानी ड्रोन येताना पाहून पळून जात नाहीत तर आपल्या सैन्याने ते पाडल्याचे व्हिडिओ बनवत आहेत. यावेळी राजनाथ सिंह यांनी भारतीय सैन्याचं कौतुक करताना असे म्हटले की, लोकांना त्यांचा नाश्ता करण्यासाठी जितका वेळ लागतो, तितक्याच वेळात तुम्ही पाकिस्तानचा विषय निपटवला.
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?

