WITT Global Summit : मोदी साधे सरळ आणि… राजनाथ सिंह यांच्याकडून तोंडभरून कौतुक
'माझ्यापेक्षा मोदी साधे सरळ आणि सौम्य आहे. समाजाच्या अंतिम शिडीवर मोदी बसलेले आहेत. तरीही झाडू मारणाऱ्यासोबत ते विनम्र आहेत. गरीब कुटुंबाशी संवाद साधताना ते सहज आणि सरळ असतात. ते अहंकार मुक्त पंतप्रधान आहे.', राजनाथ सिंह यांच्याकडून तोंडभरून कौतुक
नवी दिल्ली, २७ फेब्रुवारी, २०२४ : TV9 च्या वार्षिक संमेलन व्हॉट इंडिया थिंक्स टुडेच्या तिसऱ्या दिवशी ‘सत्ता संमेलनात’केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सहभाग घेतला होता. यावेळी त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गौरव केला. ते म्हणाले, माझ्यापेक्षा मोदी साधे सरळ आणि सौम्य आहे. समाजाच्या अंतिम शिडीवर मोदी बसलेले आहेत. तरीही झाडू मारणाऱ्यासोबत ते विनम्र आहेत. गरीब कुटुंबाशी संवाद साधताना ते सहज आणि सरळ असतात. ते अहंकार मुक्त पंतप्रधान आहे. मी साधा, सरळ आणि सौम्य असल्याची माहिती मला पहिल्यांदाच मिळाली. माझ्या मनात लवकर अहंकार निर्माण होत नाही. ही देवाची कृपा आहे. मी साधा सरळ आहे की नाही याची मी गॅरंटी देत नाही, असे त्यांनी म्हटले तर जग सध्या संकटातून जात आहे. दोन युद्ध सुरू आहेत. हे युद्ध शांत करण्यासाठी प्रभावी भूमिका केवळ भारतच निभावू शकतो. मोदींची मान्यता जवळपास जगातील सर्व राजकीय नेत्यांमध्ये आहे. रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरू झालं होतं. तेव्हा भारतातील विद्यार्थी तिकडे होते. जगातील कोणत्याही राष्ट्राध्यक्षांनी जे केलं नहाी ते मोदींनी केल्याचे म्हणत राजनाथ सिंह यांच्याकडून पुन्हा मोदींचं तोंडभरून कौतुक करण्यात आलं.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

