I.N.D.I.A आघाडीचे नाव बदलणार? अरविंद केजरीवाल यांचा संकेत अन् केला भाजपला सवाल
VIDEO | इंडिया आणि भारत या नावाच्या वादादरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काय दिले संकेत? आघाडीचं 'इंडिया' नाव बदलून 'भारत' ठेवलं तर काय कराल ? ',अरविंद केजरीवाल यांचा भाजपला सवाल
नवी दिल्ली, ६ सप्टेंबर २०२३ | देशाचं नाव भारत असावं की इंडिया या नावावरून वाद सुरू असताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी इंडिया आघाडीचं नाव बदलण्याबाबत मोठं विधान केलं आहे. विरोधकांच्या इंडिया आघाडीचं नाव बदलून भारत ठेवलं तर काय कराल? असा सवाल अरविंद केजरीवाल यांनी भाजपला थेट सवाल केला आहे. केजरीवाल असेही म्हणाले, ‘आपल्या देशात 140 कोटी जनता आहे. इंडिया आघाडीचे नाव बदलून ‘भारत’ आघाडी केलं तर ते भाजपचे नाव बदलून ‘भारत’ ठेवतील का? असा सवालही त्यांनी केला. तसेच भाजप विरोधकांच्या आघाडीवर नाराज आहे असे म्हणत वन नेशन आणि वन इलेक्शन या धोरणावर बोलताना ते म्हणाले, ‘याचा जनतेला फायदा काय? त्यामुळे महागाई आणि बेरोजगारी कमी होणार का?’

