Delhi Lal Quila Blast : दिल्ली स्फोटाचा तपास मराठी माणसाकडे, आता टेरर मॉड्यूल उद्ध्वस्त करण्यासाठी नवा प्लान
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील कार स्फोट प्रकरणाचा तपास एनआयएच्या विजय साखरे यांच्या नेतृत्वाखालील पथक करत आहे. या स्फोटातील सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, नऊ जणांचा मृत्यू आणि तीसहून अधिक जण जखमी झाले आहेत.
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील कार स्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) तपास करत आहे. यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेत दहा जणांचं पथक स्थापन करण्यात आलं आहे. एनआयएचे एडीजी विजय साखरे यांच्या नेतृत्वाखालील दहा जणांचे पथक या प्रकरणाची चौकशी करत आहे. विजय साखरे हे १९९६ च्या बॅचचे केरळ कॅडरचे आयपीएस अधिकारी असून, त्यांना तपास क्षेत्रात मोठा अनुभव आहे. सध्या विजय साखरे हे राष्ट्रीय तपास संस्थेत ADG म्हणून कार्यरत आहे. अनेक महत्त्वाच्या राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भातील प्रकरणांच्या तपासात विजय साखरेंनी नेतृत्त्व केले आहे. आता लाल किल्ला मेट्रो स्टेशन प्रकरणाचा तपास विजय साखरेंच्या नेतृत्वातील करण्यात येणार आहे.
Published on: Nov 12, 2025 03:40 PM
Latest Videos
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन

