Delhi Lal Quila Blast : स्फोटातील कारचा नवा Video समोर, PUC चेक करताना i-20 मध्ये बसलेले ते तिघं कोण?
दिल्लीतील भीषण स्फोटामुळे हादरलेल्या राजधानीत फरिदाबादमध्ये स्फोटके सापडली आहेत. या स्फोटाच्या थरारक सीसीटीव्ही फुटेजनंतर, संबंधित कारचा एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. पीयूसी तपासणीदरम्यान कारमध्ये तीन लोक असल्याचे यात दिसत असून, केंद्रीय गृहमंत्र्यांनी एनआयएला तातडीने तपास करण्याचे निर्देश दिले आहेत.
दिल्लीत नुकत्याच झालेल्या भीषण स्फोटानंतर तपासाला वेग आला आहे. दिल्ली स्फोट प्रकरणी आता संबंधित कारचा एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ i-20 कारचा असून, तो स्फोट होण्यापूर्वी सव्वाचार वाजताच्या सुमारास पीयूसी तपासणी करतानाचा आहे. या व्हिडिओमध्ये कारमध्ये तीन लोक असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
हा व्हिडीओ काल दुपारी 16 वाजून 19 मिनिटांनी, म्हणजेच सव्वाचार वाजताच्या सुमारासचा आहे. पीयूसी तपासणी करतानाचा हा व्हिडिओ असून, यामध्ये कारमध्ये तीन लोक स्पष्टपणे दिसत आहेत. पीयूसी तपासणी झाल्यानंतर कारचालक आणि इतर दोघे कारमध्ये बसून घटनास्थळावरून निघून जात असल्याचेही या दृश्यांमध्ये कैद झाले आहे. हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि तपासासाठी तो अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

