दिल्लीतील महाराष्ट्र सदनमध्ये धुराचे साम्राज्य, गव्हर्नर सूटमध्ये आग

महाराष्ट्र सदन परिसरात धुराचं साम्राज्य पसरलं होतं. महाराष्ट्र सदनातील गव्हर्नर सूटमधून आग पसरल्याचा अंदाज आहे. कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्त हानी झाल्याची माहिती नाही.

राजधानी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात सोमवारी सकाळी आग लागली होती. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी गेल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार आग विझवण्यात आली आहे. आगीच्या घटनेमागील कारणांचा शोध घेण्यात येत आहे. सदनात कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्त हानी झाल्याची माहिती नाही. मात्र महाराष्ट्र सदन परिसरात धुराचं साम्राज्य पसरलं होतं. महाराष्ट्र सदनातील गव्हर्नर सूटमधून आग पसरल्याचा अंदाज आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI