Delhi Lal Quila Blast : 10 तास 48 मिनिटांचा प्रवास, 7 वाजता स्फोट, दिल्ली स्फोटातील i20 कार कुठं कुठं फिरली? स्फोट कसा झाला?
दिल्लीत लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाने खळबळ उडाली आहे. आय२० कारमधील फिदायीन हल्ल्याची शक्यता असून, डॉ. उमर मोहम्मद संशयाच्या भोवऱ्यात आहे. स्फोटापूर्वी कारने दिल्लीत १० तास ४८ मिनिटे प्रवास केला. एनआयएने तपास हाती घेतला असून, फरिदाबाद कनेक्शन आणि कार मालकांची साखळी समोर आली आहे.
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ आय२० कारमध्ये झालेल्या स्फोटाने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. हा स्फोट फिदायीन पद्धतीचा असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आय२० कारच्या ड्रायव्हिंग सीटवर डॉ. उमर मोहम्मद असण्याची शक्यता तपास यंत्रणांकडून व्यक्त केली जात असून, डीएनए चाचणीद्वारे याची पुष्टी केली जाईल. तपास यंत्रणांच्या भीतीने उमरने हा कट रचल्याचे सूत्रांकडून समजते.
स्फोटग्रस्त आय२० कारने दिल्लीत तब्बल १० तास ४८ मिनिटे प्रवास केला. सकाळी ८ वाजता बदरपूर टोलनाक्यावरून दिल्लीत दाखल झालेली ही कार संध्याकाळी ६ वाजून ५२ मिनिटांनी स्फोटात सापडली. फरिदाबादमधून खरेदी केलेल्या या कारचे संबंध काश्मीर, लखीमपूर आणि गुजरातपर्यंत जोडलेले आहेत. ओखला औद्योगिक क्षेत्र, सुनहरी मशीदजवळ पार्किंग आणि नंतर दर्यागंज-काश्मिरी गेटच्या दिशेने कार गेली.
या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी १३ संशयितांना रडारवर घेतले आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी आमिर नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या स्फोटाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) कडे सोपवला आहे. एनआयए या प्रकरणाचा सखोल तपास करणार आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

