AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Delhi Lal Quila Blast : स्फोटापूर्वीचे 'ते' 3 तास... ज्यामध्ये धमाका त्या i20 कारचे फोटो अन् CCTV समोर, नेमकं काय दिसतंय त्यात?

Delhi Lal Quila Blast : स्फोटापूर्वीचे ‘ते’ 3 तास… ज्यामध्ये धमाका त्या i20 कारचे फोटो अन् CCTV समोर, नेमकं काय दिसतंय त्यात?

| Updated on: Nov 11, 2025 | 12:30 PM
Share

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोट प्रकरणी अज्ञातांविरोधात UAPA कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. स्फोटापूर्वी तीन तास आधी घटनास्थळाजवळ थांबलेल्या एका i20 कारचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या कारचा मास्क घातलेला चालक पोलिसांच्या संशयाच्या घेऱ्यात आहे. विविध तपास यंत्रणा आणि फॉरेन्सिक टीमकडून या प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे.

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोट प्रकरणी अज्ञातांविरोधात UAPA कायद्याच्या कलम 16 आणि 18 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्फोटापूर्वी तीन तास आधी लाल किल्ल्याजवळ उभ्या असलेल्या एका i20 कारची छायाचित्रे आणि सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. फुटेजमध्ये दिसणारा मास्क घातलेला कारचालक दहशतवादी मॉड्युलशी संबंधित असू शकतो, असा पोलिसांना संशय आहे. घटनेला 12 तास उलटूनही फॉरेन्सिक टीम आणि दिल्ली पोलिसांचे क्राईम ब्रांचचे अधिकारी घटनास्थळी तळ ठोकून आहेत.

स्फोटात सापडलेले मानवी अवयवाचे नमुने फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. एनआयए, एनएसजीसह अनेक तपास यंत्रणा या प्रकरणी चौकशी करत आहेत. दिल्ली पोलिसांनी जम्मू-काश्मीर आणि फरिदाबाद गुन्हे शाखेशी संपर्क साधला असून, फरिदाबाद दहशतवादी मॉड्युलबद्दल माहिती मागवली आहे. लाल किल्ला मेट्रो स्थानकाचे गेट क्रमांक एक आणि चार पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत.

Published on: Nov 11, 2025 11:00 AM