Delhi Lal Quila Blast : ज्या कारमध्ये स्फोट, त्यात दहशतवादी उमर, 18 मोबाईलसह पोलिसांच्या ताब्यात अन्… मोठी माहिती उघड
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटप्रकरणी युएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दहशतवादी उमर मुख्य आरोपी असून, त्याच्या दोन भावांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून 18 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. स्फोटापूर्वीची i20 कारची सीसीटीव्ही फुटेज समोर आली असून, उमर पुलवामाचा रहिवासी असल्याचे उघड झाले आहे.
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटप्रकरणी मोठी घडामोड समोर आली आहे. या घटनेनंतर अज्ञातांविरोधात युएपीएच्या कलम 16 आणि 18 अंतर्गत कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्फोटात वापरण्यात आलेल्या i20 कारची सीसीटीव्ही फुटेज समोर आली आहेत. ही कार स्फोटाच्या तीन तास आधी लाल किल्ल्याजवळ उभी होती आणि पार्किंगमधून निघाल्यानंतर अवघ्या चार मिनिटांत स्फोट झाल्याचे फुटेजमधून दिसत आहे.
या स्फोटामागे दहशतवादी डॉक्टर उमर असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनेनंतर परिसरात मोठा आवाज होऊन आगीचे लोळ दिसले आणि नागरिकांची धावपळ उडाली. उमरच्या कुटुंबियांनी मात्र स्फोटातील कार त्यांची नसल्याचा दावा केला आहे. या प्रकरणी उमरचे दोन भाऊ पोलिसांच्या ताब्यात असून त्यांची चौकशी सुरू आहे. सूत्रांनुसार, उमरनेच कारसाठी पैसे दिल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांना उमरच्या भावांकडून 18 मोबाईल जप्त केल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?

