Delhi Blast Terrorist Umar : फाडफाड इंग्लिश अन् जिहादचं विष.. दहशतवादी उमरचा स्फोटापूर्वीचा हादरवणारा VIDEO समोर
दिल्ली स्फोट प्रकरणातील दहशतवादी उमर नबीचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये दहशतवाद्यांच्या संपूर्ण विनाशाच्या योजनेचे संकेतही मिळताना दिसताय. उमर या व्हिडिओमध्ये आत्मघाती बॉम्बस्फोटाचे समर्थन करताना दिसतोय.
दिल्ली बॉम्बस्फोट घडवणारा दहशतवादी मोहम्मद उमर नबीचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. दहशतवादी मोहम्मद उमर नबीचा हा व्हिडीओ ब्लास्ट करण्यापूर्वी काही तास आधीचा असल्याचे सांगितले जात आहे. हा नवा व्हिडीओ तपास यंत्रणांच्या हाती लागला असू हा व्हिडीओ दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणातील सुरू असलेल्या तपासासाठी महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो. या व्हिडीओमध्ये दहशतवादी मोहम्मद उमर नबी फाडफाड इंग्लिश बोलताना दिसतोय. इंग्लिशमध्ये भाषण देत त्याने आत्मघाती बॉम्बस्फोटचे समर्थन केल्याचे पाहायला मिळतेय.
तर दिल्ली बॉम्बस्फोट हा घाईत केला नाही. हा अतिशय सुविचारित आणि हेतूने रचलेला दहशतवादी कट होता. यावेळी मृत्यूला घाबरू नका, असे तो म्हणत असल्याचे दिसते.
Published on: Nov 18, 2025 04:07 PM
