Ajit Pawar यांची विधानसभेत तुफान टोलेबाजी
कोकणाला दहा वर्षे मिळालं, पश्चिम महाराष्ट्रवाला 20 वर्षे मिळालं तर मराठवाडा आणि विदर्भाला तर तब्बल 32 वर्षे मुख्यमंत्रिपद मिळालं. मात्र अजूनही उत्तर महाराष्ट्रातून कोणी मुख्यमंत्री झालं नाही. यावरूनच अजित पवारांनी भाजपला पुन्हा डिवचलं आहे.
मुंबई : अधिवेशनाचा गुरूवारचा दिवस फडणवीसांनी (Devendra Fadnavis) तुफान आरोप करत गाजवला. मात्र त्याला आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पावारांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. फडणवीसांच्या आरोपांचा समार घेऊन मुख्यमंत्री (Cm Uddhav Thackeray) बसले. मग लगेच अजित पवार (Ajit Pawar) बोलायला उभा राहिले. अजित पवारांनीही फडणवीसांना जोरदार कोपरखिळ्या मारल्या. उत्तर महाराष्ट्रला अजूनही मुख्यमंत्रीपद मिळालं नाही. कोकणाला दहा वर्षे मिळालं, पश्चिम महाराष्ट्रवाला 20 वर्षे मिळालं तर मराठवाडा आणि विदर्भाला तर तब्बल 32 वर्षे मुख्यमंत्रिपद मिळालं. मात्र अजूनही उत्तर महाराष्ट्रातून कोणी मुख्यमंत्री झालं नाही. यावरूनच अजित पवारांनी भाजपला पुन्हा डिवचलं आहे. त्यांनी खडसे आणि गिरीश महाजन यांचं नाव न घेता भाजपच्या जखमेवर मीठ चोळलं आहे.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
