Sanjay Raut | राहुल गांधींना लोकसभा सचिवालयाची नोटीस, संजय राऊत संतापलेच; थेट म्हणाले…
राहुल गांधींना आलेल्या नोटिशीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. भाजपच्या लोकांना इडियट संबोधत, राऊतांनी पंतप्रधानांच्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरील भाषणाचादेखील उल्लेख केला.

राऊतांनी दावा केला आहे की त्यावेळी पंतप्रधानांचा टेलीप्रॉम्प्टर बंद पडल्याच्या घटनेचा उल्लेख केला. यामुळे पंतप्रधान अडखळले, लटपटले आणि त्यांना घाम फुटला, यावरून राऊतांनी सरकारवर निशाणा साधला. सध्याचे सरकार इडियट लोकांकडून चालवले जात असल्याचा आरोप राऊतांनी केला. महाराष्ट्रात आणि देशातही शोधून-शोधून इडियट लोक कॅबिनेटमध्ये घेतले जात आहेत, असे ते म्हणाले. यासोबतच, त्यांनी वंदे मातरम्च्या इतिहासाची आठवण करून देत, भगतसिंग आणि सुखदेव यांच्या बलिदानाचा उल्लेख केला. बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांना भारतीय जनता पक्षाने राज्यसभेत आणले असून ते अंधभक्त असल्याचा दावाही राऊतांनी केला. सध्या देशात हवा बदलतेय आणि सरकार बदलतेय असे भाकीत त्यांनी वर्तवले.
Published on: Aug 16, 2026 12:15 PM
आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीच आमदाराने.... ठाकरेंचे आमदारही बंड करणार?
प्रणिती शिंदेंच्या कार्यक्रमात वंदे मातरम् प्रकरणी नव्या वादाची शक्यता
राहुल गांधींना लोकसभा सचिवालयाची नोटीस, संजय राऊत संतापलेच; थेट...
प्रकृती अस्वस्थ असानाही मनोज जरांगेचा मोठा निर्णय! रुग्णालयातू...