फडणीस प्रकरणावरून म्हात्रेंचा मविआवर निशाना; अशी महाराष्ट्राची संस्कृती नाही
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी अमृता फडणवीस यांच्या फसवणुकीप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या फसवणुकीप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत अनिक्षा जयसिंघानीयाला अटक केली. त्यानंतर याप्रकरणी पत्नी अमृता फडणवीस यांना एका डिझायनर महिलेकडून फसवणूक आणि ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा दावा फडणवीसांनी केला. तसेच हा एक राजकीय कट आहे. जोपर्यंत पुरावा हाती येत नाही तोपर्यंत बोलणार नाही, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणावरून राजकारण करण्याचा प्रयत्न दुर्देवी असल्याचं मत म्हात्रे यांनी व्यक्त केलं आहे. तर म्हात्रे यांनी, राजकीय स्तर घसरत चालल्याचे म्हणत राजकीय पूर्ण यंत्रणा वापरून ज्या पद्धतीने त्यांना ट्रॅप केलं गेलं खरं तर हे खरोखर दुर्दैवी आहे. उपमुख्यमंत्री जे गृहमंत्री आहेत त्यांच्याच पत्नीला अशा पद्धतीने ट्रॅप करायला प्रयत्न केला जातोय हे दुर्दैवी आहे. महिलांच्या संदर्भात हे वारंवार होत आहे. असं महाविकास आघाडीकडून का होतयं असा सवाल त्यांनी करत अशी महाराष्ट्राची संस्कृती नाही असंही त्या म्हणाल्या.
Published on: Mar 17, 2023 07:24 AM
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
