Devendra Fadnavis | ‘मुंबईच्या समस्येचा आरोपी कोण? मुंबईकर न्याय करतील तेव्हा सत्तापालट झालेला असेल’
मुंबईचा खटला हा मुंबईच्या जनतेच्याच न्यायालयात ठेवायचा आहे. मुंबईकरांना सांगायचं आहे की, न्यायाधीश तुम्ही, आरोपी हे आणि आता मुंबईकरता न्याय करा
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी षण्मुखानंद सभागृहात भाजपची सभा घेण्यात आली. यावेळी फडणवीस म्हणाले, मराठी माणसाची लढाई लढणारे जर कोणी असेल तर या ठिकाणी या मंचावर बसलेले आशिष शेलार यांच्या नेतृत्वातले आम्ही सगळे आहोत. आम्हाला मराठीचा अभिमान आहे आणि तो असलाच पाहिजे. भाजप हा क्षेत्रीय रक्षण करणारे आहे. आता महापालिकेच्या निवडणूका जवळ आहेत. मुंबईचीही होणार आहे. त्यामुळे आपल्याला सगळ्यांना आता समोर जावं लागेल. मुंबईचा खटला हा मुंबईच्या जनतेच्याच न्यायालयात ठेवायचा आहे. मुंबईकरांना सांगायचं आहे की, न्यायाधीश तुम्ही, आरोपी हे आणि आता मुंबईकरता न्याय करा. तर आफल्याला विश्वास आहे की, त्यावेळी जनता न्याय करेल आणि जनतेच्या मनातलं जे काही आहे ते या ठिकाणी निश्चितपणे समोर येईल.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?

