धानोरकर यांच्या निधनावर फडणवीस यांची प्रतिक्रिया; म्हणाले, ‘कालच चौकशी केली आणि आज…’
त्यांना काही दिवसांपासून पित्ताशय आणि स्वादुपिंडाचा त्रास होत होता. त्यामुळे त्यांच्यावर दिल्ली इथल्या मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र अखेर त्यांची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अपयशी ठरली.
मुंबई : चंद्रपूरचे काँग्रेसचे खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांचं वडिलांपाठोपाठ चार दिवसातच निधन झाले. त्यांना काही दिवसांपासून पित्ताशय आणि स्वादुपिंडाचा त्रास होत होता. त्यामुळे त्यांच्यावर दिल्ली इथल्या मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र अखेर त्यांची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अपयशी ठरली. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांनी वयाच्या 47 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. यावेळी त्यांनी, याबाबत आपण त्यांची चौकशी केली होती. त्यावेळी त्यांची प्रकृती चिंताजनक होती. आम्हाला वाटतं होतं की ते यातून बाहेर पडतील. पण आज त्यांच्या दुखद निधनाची बातमी समजली. अचानक त्यांचं जाणं अतिशय दुख: दायक आहे. तर हा समाजाला आणि राजकीय क्षेत्राला एक धक्का आहे.
राणे बंधूंच्या लढाईत निलेश राणेंची सरशी; मालवण, कणकवलीत भाजपला धक्का
उपऱ्यांचा प्रवेश, नाराज निष्ठावंत BJP समर्थकांचं आंदोलन, भाजपमध्ये वाद
सून जिंकली, सासू रुसली! राजकीय घराणं अन् नेत्यांच्या गणगोताचा निकाल
कुठं कोणाचा सुपडासाफ? कोण कुणाला नडलं? कुठं कोण कुणाशी भिडलं?

