Eknath Shinde : कुणाल कामराच्या ‘त्या’ गाण्यावर एकनाथ शिंदें स्पष्टच म्हणाले, ‘मी दुर्लक्ष केलं पण हे सुपारी…’
'अभिव्यक्ती स्वातंत्र्य हवेच. विडंबन आम्ही समजू शकतो. अनेक कवी विडंबन करायचे. पण हा एक प्रकारचा स्वैराचार, व्याभिचार आहे. हे सुपारी घेऊन बोलण्याचे काम आहे. पण कुणाल कामरा याने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यावर टीका केली'
कॉमेडियन कुणाल कामरा याने शिवसेना फुटीवर एक व्यंगात्मक गाणे केले आणि चांगलाच वादाच्या भोवऱ्यात सापडला. या गाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर वैयक्तिक बदनामी केल्याचा आरोप करण्यात आला. यावरूनच शिवसैनिकांनी मुंबईत संताप व्यक्त करण्यात आला. त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनीच आपली प्रतिक्रिया दिली आहे. खरा गद्दार आणि खुद्दार कोण हे महाराष्ट्राने दाखवून दिलं आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले. तर व्याभिचार, स्वैराचार आणि सुपारी घेऊन बोलण्याचं काम कुणाल कामरा याने केलं असल्याचे म्हणत शिंदेंनी विडंबनात्मक गाण्यावर आपलं मत व्यक्त केलं. तर कामराने माझ्यावर केलेल्या आरोपांवर मी दुर्लक्ष करतो असंही एकनाथ शिंदे म्हणाले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत एकनाथ शिंदे यांनी कामराच्या गाण्यावर पहिली प्रतिक्रिया दिली. आरोपाला मी नेहमी कामातून उत्तर देतो. त्याचे फलित म्हणून जनतेने आम्हाला निवडून दिले. त्यामुळे जे आमच्यावर पक्ष चोरला, चिन्ह चोरले असा आरोप करायचे तर राज्यातील खरा गद्दार कोण असा सवाल करत त्यांनी निवडणुकीत राज्यातील जनतेने दिलेल्या बहुमतावर भाष्य केले.

'अभिनंदन ठाकरे बंधूंनो, मनापासून एकत्र या..', शिवसेना भवनसमोर बॅनरबाजी

संतोष देशमुखांच्या घराजवळ फिरणारी 'ती' महिला कोण?

पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल

दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय
