Sanjay Raut : तोंडाला मास्क, चेहऱ्यावर काहिसा थकवा… राऊत बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी अन् वाहिली आदरांजली
प्रकृती अस्वास्थ्यामुळे सार्वजनिक जीवनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतलेले खासदार संजय राऊत यांनी आज बाळासाहेब ठाकरे यांच्या 13 व्या स्मृतीदिनी शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळाला भेट दिली. कुटुंबीयांसह आलेल्या राऊत यांनी बाळासाहेबांना आदराने अभिवादन केले. बाळासाहेबांना राजकीय गुरु मानणाऱ्या राऊत यांना गंभीर आजार असूनही स्वतःला रोखता आले नाही.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 13 व्या स्मृतीदिनी शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळाला भेट देऊन आदरांजली वाहिली. गंभीर प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी दोन महिने सार्वजनिक आणि राजकीय जीवनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे, तरीही ते बाळासाहेबांना अभिवादन करण्यापासून स्वतःला रोखू शकले नाहीत. राऊत यांच्यासोबत त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत आणि कन्या विदिता उपस्थित होत्या.
बाळासाहेबांना आपले दैवत आणि राजकीय गुरु मानणारे संजय राऊत सध्या मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात उपचार घेत आहेत. आज उपचारानंतर ते थेट स्मृतीस्थळावर आले होते. त्यांनी शिवसैनिकांना हात उंचावून अभिवादन केले, मात्र माध्यमांशी बोलण्यास नकार दिला. संसर्गाचा धोका टाळण्यासाठी त्यांनी मास्क परिधान केला होता.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप

