Marathi News Videos Determination of women in self help groups hanuman chalisa will be recited outside dcm devendra fadnavis house

बचत गटातील महिलांचा निर्धार, फडणवीस यांच्या घराबाहेर हनुमान चालीसा वाचणार
मानधन वेळेत न दिल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन छेडण्यात येणार आहे. आपले मानधन वेळेत देण्यात यावे अशी या महिलांनी मागणी असून जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर हनुमान चालीसाचे पठण करणार आहेत.
वर्धा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील घरासमोरच आता हनुमान चालिसाचे पठण करण्यात येणार आहे. हे आंदोलन मनसे किंवा शिवसेना पक्षांचे नसून महिला बचत गटाच्या महिला सदस्यांचे आहे. वर्धा येथील ग्रामीण जीवन ज्योती बचत गटाच्या महिला हे आंदोलन करणार आहेत. मानधन वेळेत न दिल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन छेडण्यात येणार आहे. आपले मानधन वेळेत देण्यात यावे अशी या महिलांनी मागणी असून जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर हनुमान चालीसाचे पठण करणार आहेत.
Published on: Feb 13, 2023 11:04 AM
Related Video
गोंदिया -धान पिकाला बोनस देण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्याचा मोर्चा
जळगावात रिक्षावाल्यांचा मराठीचा तास, सर्व रिक्षावाले मराठीच निघाले !
आरटीओकडून मराठी भाषा संदर्भात सुरू असलेल्या कारवाईमुळे अमराठी चालकांमध्ये नाराजी
साखर महागली; कटिंग चहासाठी जादा पैसे मोजावे लागणार
महामार्गाच्या दुरावस्थेवरून सामाजिक कार्यकर्त्याचा अर्धनग्न होत पायी प्रवास