Eknath Shinde : 1 जुलैला देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदे सरकारचा शपथविधी? मंत्रिपदाबाबत अद्यापही चर्चा नाही?

भाजप नेते देवेंद्र फडणवीस सत्तास्थापनेचा दावा आज राज्यपालांकडे करणार असल्याची माहिती कालच सूत्रांनी दिली होती. आज तीन वाजता भाजप सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत. तर 1 जुलैला देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदे सरकारचा शपथविधी होणार असल्याचं सूत्र सांगतात. दरम्यान, मंत्रीपदाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही, अशी माहिती शिंदे यांनी दिली आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शुभम कुलकर्णी

Jun 30, 2022 | 1:18 PM

मुंबई : आज तीन वाजता भाजप सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत. भाजप (BJP) नेते देवेंद्र फडणवीस सत्तास्थापनेचा दावा आज राज्यपालांकडे करणार असल्याची माहिती कालच सूत्रांनी दिली होती.  उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रीपदाचा (CM) राजीनामा दिल्यानंतर राज्यातील घडामोडींना वेग आलाय.  तर 1 जुलैला देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदे सरकारचा शपथविधी होणार असल्याचं सूत्र सांगतात. दरम्यान, मंत्रीपदाबाबत अद्यापही कोणतीही चर्चा झाली नसल्याची माहिती आहे. शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं होतं. यानंतर वेळोवेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांना मुंबईत बोलावण्याचा अनेकदा प्रयत्न केला. मात्र, दुसरीकडे शिवसेना नेते संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्या टीका टिप्पणी आणि आरोपांमुळे बंडखोरांनी वेगळी वाट पकडली. आता 1 जुलैला भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एकनाथ शिंदे गट सरकार स्थापन करणार असून सत्तेचा फॉर्म्यूला देखील तयार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हाच सत्तेचा फॉर्म्यूला टीव्ही9च्या हाती लागलाय. तर मंत्रीपदाबाबत लवकरच चर्चा होण्याची देखील शक्यता आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें