AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mohan Mate ON CM | देवेंद्र फडणवीस हेच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री, आमदार विकास मतेंच्या विधानाने पुन्हा वादंग, भाजप नेत्यांच्या मनातील धुसफूस चव्हाट्यावर

Mohan Mate ON CM | देवेंद्र फडणवीस हेच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री, आमदार विकास मतेंच्या विधानाने पुन्हा वादंग, भाजप नेत्यांच्या मनातील धुसफूस चव्हाट्यावर

| Updated on: Jul 22, 2022 | 4:00 PM
Share

Mohan Mate ON CM | भाजपचे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित मानण्यात येत असताना त्यांना पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे नाखुशीने उपमुख्यमंत्री पद स्वीकारावे लागेल. त्याचे पडसाद आता राज्यात उमटत आहेत.

Mohan Mate ON CM News | सत्तांतर नाट्यानंतर राज्यात नवीन सरकारच्या स्थापनेबाबत एक गालबोट लागले होते. आपण सत्तेबाहेर राहून कारभारावर लक्ष्य ठेऊ असे वक्तव्य भाजपचे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले होते. परंतू अवघ्या काही तासातच त्यांना या निर्णयापासून परावृत्त करण्यात आले आणि त्यांनी उपमुख्यमंत्री (Deputy CM) पदाची सूत्रे स्वीकारली. परंतू, यामुळे त्यांचे समर्थक प्रचंड नाराज झाल्याचे दिसून आले. त्यांच्या मनातील खदखद आता बाहेर येत आहे. नागपूरमध्ये भाजपचे आमदार मोहन मते (MLA Mohan Mate) यांनी देवेंद्र फडणवीस हेच राज्यातील जनेतच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्याने राज्यातील भाजप नेत्यांच्या मनातील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. तर या दाव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

महाविकास आघाडीविरोधात (Mahavikas Aaghadi) अडीच वर्षात प्रत्येक आघाडीवर विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीस यांनी रान पेटवले. सरकारला सळो की पळो केले. आज सत्तांतर झाले आहेत. जे प्रामाणिक शिवसैनिक(Shiv sainik) महाविकास आघाडीत जाऊ इच्छित नव्हते. त्यांनी वेगळा गट स्थापन भाजपासोबत राज्यात सत्तांतर घडवून आणले. देवेंद्र फडणवीस हे राज्यपालांना भेटले त्यावेळी म्हटले होते की, आपण कोणतेही मंत्रीपद स्वीकारणार नाहीत. भाजपच्या शीर्ष नेतृत्वाने त्यांना सत्तेत राहण्याची गळ घातली. आज मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे असले तरी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचा दावा मते यांनी केला. मते यांनी याविषयीचा एक लेख लिहिला आहे.