शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची काल जयंती होती. त्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्रांचं अनावरण करण्यात आलं. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेबांच्या व्यक्तीमत्वाचे पैलू उलगडले. तेव्हा बोलताना बाळासाहेबांना कधीही विधिमंडळात येण्याचा मोह नव्हता, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत. एकदा बाळासाहेबांना एक प्रश्न विचारण्यात आला की, गोड खाल्लेलं तुम्हाला चालतं का? त्यावर पैसे सोडून मी सगळं काही खातो, असं बाळासाहेब ठाकरेंनी सांगितल्याचा किस्सा फडणवीसांनी सांगितला.