Video : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी एका क्लिकवर, पाहा सुपरफास्ट टॉप 50 न्यूज…

| Updated on: May 07, 2022 | 3:28 PM

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्यातील निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय (obc reservation) पार पडणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये भाजप (bjp) ओबीसींना 27 टक्के आरक्षण देणार असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केलं होतं. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिक्कामोर्तब केलं आहे. काही वाटेल ते झालं आणि कोणतीही किंमत मोजावी लागली तरी ओबीसी […]

Video : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी एका क्लिकवर, पाहा सुपरफास्ट टॉप 50 न्यूज...
Image Credit source: TV9
Follow us on

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्यातील निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय (obc reservation) पार पडणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये भाजप (bjp) ओबीसींना 27 टक्के आरक्षण देणार असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केलं होतं. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिक्कामोर्तब केलं आहे. काही वाटेल ते झालं आणि कोणतीही किंमत मोजावी लागली तरी ओबीसी आरक्षणाचा लढा लढला जाईल. जेवढ्या निवडणुका येतील त्यात आरक्षण असो की नसो. आम्ही ओबीसींना 27 टक्के आरक्षण देणार, अशी घोषणाच देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. भाजपच्या ओबीसी मोर्चाचा एक मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी संबोधित करताना फडणवीस यांनी ही घोषणा केली आहे.