AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देवेंद्र फडणवीस यांचा राजभाषा दिनी मातृभाषा आणि भारतीय भाषांच्या गौरवाचा संदेश

देवेंद्र फडणवीस यांचा राजभाषा दिनी मातृभाषा आणि भारतीय भाषांच्या गौरवाचा संदेश

| Updated on: Sep 14, 2026 | 4:10 PM
Share

देवेंद्र फडणवीस यांनी मातृभाषेच्या महत्त्वावर भर दिला. ते म्हणाले की, मातृभाषेसोबत किमान एक अन्य भारतीय भाषा शिकणे ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ संकल्पनेसाठी आवश्यक आहे. त्यांनी हिंदी भाषेचे महत्त्व, स्वातंत्र्य संग्रामातील तिची भूमिका आणि साहित्य क्षेत्रातील योगदान अधोरेखित केले, तसेच सर्व भारतीय भाषांचा सन्मान करण्याचे आवाहन केले.

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजभाषा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मातृभाषेचे महत्त्व आणि भारतीय भाषांचा गौरव यावर आपले विचार मांडले. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच मातृभाषेवर आणि भारतीय भाषांच्या संवर्धनावर भर दिला आहे. मातृभाषेसोबतच किमान एक देशातील अन्य भाषा शिकणे हे एक भारत, श्रेष्ठ भारत या संकल्पनेसाठी अत्यंत आवश्यक आहे.

फडणवीस यांनी हिंदी भाषेच्या ऐतिहासिक प्रवासावर प्रकाश टाकला, स्वातंत्र्यानंतर राजभाषा म्हणून हिंदी स्वीकारण्याबाबतच्या चर्चांचा उल्लेख केला. त्यांनी स्पष्ट केले की, हिंदी आज जगातील तिसरी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे आणि तिचा साहित्य वारसा समृद्ध आहे. मुन्शी प्रेमचंद आणि राष्ट्रकवी दिनकर यांसारख्या साहित्यिकांनी हिंदीला लोकभाषा बनवून तिची उंची वाढवली. फडणवीस यांनी या कार्यक्रमात सर्व भारतीय भाषांचा आदर करण्याचे आवाहन केले, “माझी आई मराठी आहे, पण बाकी सर्व भाषा माझ्या मावशा आहेत,” असे सांगत त्यांनी भाषिक एकतेचा संदेश दिला. या माध्यमातून सशक्त भारताची निर्मिती होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Published on: Sep 14, 2026 04:10 PM

Follow Us