“माझ्या गुगलीवर फडणवीस यांची विकेट”, शरद पवार यांच्या टीकेवर देवेंद्र फडणवीस म्हणतात, “अजित पवार…”
पहाटेच्या शपथविधीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल मोठा दावा केला होता.त्यावर शरद पवार यांनी आपण टाकलेल्या गुगलीवर देवेंद्र फडणवीस यांची विकेट पडली, अशी टीका केली. शरद पवार यांच्या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला आहे.
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल मोठा दावा केले. पहाटेच्या शपथविधीवेळी शरद पवार यांनीच पुढाकार घेतला होता. पण नंतर त्यांनी ऐनवेळी माघार घेत आमच्यासोबत डबलगेम केला, असं फडणवीस म्हणाले होते. त्यावर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्ट भूमिका मांडली. आपण टाकलेल्या गुगलीवर देवेंद्र फडणवीस यांची विकेट पडली, असं शरद पवार म्हणाले. याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला आहे. ते म्हणाले की, “मला अतिशय आनंद आहे, शेवटी शरद पवार यांना सत्य सांगावं लागलं. मला असं वाटतं मी जी गुगली टाकली त्यात त्यांचं अर्थ सत्य बाहेर आलं आहे. अजून उरलेलं सत्य मी बाहेर काढेन. शरद पवार यांच्या गुगलीनं माझी विकेट पडण्याऐवजी त्यांचे पुतणे अजित पवार यांचीच विकेट पडली.”
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली

