AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

'तर इतका गहजब का?', सरन्यायाधीशांच्या घरी बाप्पाच्या दर्शनाला मोदी, विरोधकांच्या टीकेवर फडणवीसांचं थेट प्रत्युत्तर

‘तर इतका गहजब का?’, सरन्यायाधीशांच्या घरी बाप्पाच्या दर्शनाला मोदी, विरोधकांच्या टीकेवर फडणवीसांचं थेट प्रत्युत्तर

| Updated on: Sep 12, 2024 | 5:14 PM
Share

'भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घरी डॉ. पंतप्रधानांनी श्रीगणेशाची आरती आणि गौरीची पूजा करण्यात आली. सरन्यायाधीश हे महाराष्ट्राचे आहेत.पण अचानक जणू आभाळच फुटल्याप्रमाणे परिसंस्था सक्रिय झाली आहे.' , विरोधकांच्या टीकेला देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घरी गणोशोत्सवानिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखल होत त्यांच्या गणपती बाप्पाचे काल ११ ऑगस्ट रोजी दर्शन घेतले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आरतीही करण्यात आली. सध्या धनंजय चंद्रचूड आणि त्यांचे कुटुंबीय काही फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत असताना दुसरीकडे विरोधक देखील यावरून टीका करत आहेत. विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला देवेंद्र फडणवीसांनी टि्वटमधून उत्तर दिले आहे. ‘आधीचे पंतप्रधान त्यांच्या निवासस्थानी इफ्तार पार्टी ठेवायचे. या इफ्तार पार्टीला त्यावेळचे सरन्यायाधीशही उपस्थित राहायचे’, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले तर गणपती बाप्पाच्या दर्शनाला नरेंद्र मोदी गेले तर का इतका गहजब का? असा सवालही देवंद्र फडणवीस यांनी विरोधकांना केला. हिंदुत्वाला विरोध करता-करता आता गणपती गौरींना विरोध करण्यापर्यंत का मजल जावी? हा प्रश्न गहन आहे, असे ट्वीटच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय.

Published on: Sep 12, 2024 05:14 PM