AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis | 'मविआ सरकार घाबरलेलं, स्वत:च्या आमदारांवरही त्यांचा विश्वास नाही'- फडणवीस

Devendra Fadnavis | ‘मविआ सरकार घाबरलेलं, स्वत:च्या आमदारांवरही त्यांचा विश्वास नाही’- फडणवीस

| Edited By: | Updated on: Dec 22, 2021 | 7:46 PM
Share

हे सरकार घाबरलेलं आहे. या सरकारला स्वत:च्या आमदारांवरही विश्वास नाही, असा घणाघात विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलाय. त्याचबरोबर सभागृहात कोणकोणत्या विषयांवरुन सरकारला घेरलं, त्याची माहितीही फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

मुंबई : विधानसभा अध्यक्ष निवडणुकीवरुन महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) विरुद्ध भाजपमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. अध्यक्षाची निवड आवाजी मतदानाने करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. त्यावर हे सरकार घाबरलेलं आहे. या सरकारला स्वत:च्या आमदारांवरही विश्वास नाही, असा घणाघात विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलाय. त्याचबरोबर सभागृहात कोणकोणत्या विषयांवरुन सरकारला घेरलं, त्याची माहितीही फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

सरकारवर हल्लाबोल चढवताना फडणवीस म्हणाले की, ‘अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी जो प्रस्ताव आज मांडण्यात आला त्यातून हे सरकार किती असुरक्षित आहे हे लक्षात आलं. 60 वर्षापर्यंत अध्यक्षांची निवडणूक गुप्त पद्धतीने झाली. अगदी जेव्हा विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये फक्त 5 – 7 मतांचा फरक होता तेव्हाही ही निवडणूक गुप्त पद्धतीने झाली. पण 170 आमदार आमच्याकडे आहेत असं सांगणाऱ्या महाविकास आघाडीला ओपन पद्धतीनं ही निवडणूक घेण्याची नामुष्की ओढावली. कारण त्यांच्यातील असंतोष इतका भयानक आहे की त्यांना खात्री आहे की त्यांचे आमदार हा असंतोष अध्यक्षांच्या निवडणुकीत व्यक्त करतील आणि त्यांच्यावर नामुष्की ओढावले. म्हणून त्यांनी नियम बदलाचा घाट घातला’. अशी टीका त्यांनी केली आहे.

Published on: Dec 22, 2021 07:46 PM