Devendra Fadnavis | सरकार अमरावतीच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे; मुख्यमंत्र्यांचे जनतेला आश्वासन
अमरावती रोड शोला प्रचंड प्रतिसाद दिल्याने एक गोष्ट स्पष्ट झालीये की या महानगरपालीकेच्या निवडणुकीत अमरावतीमध्ये भाजपला पुर्ण बहुमत आहे.असं मुख्यमंत्री त्यांच्या भाषणादरम्यान म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती येथे जनतेला संबोधित करताना राज्य सरकार अमरावतीच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे ठामपणे सांगितले.
अमरावती रोड शोला प्रचंड प्रतिसाद दिल्याने एक गोष्ट स्पष्ट झालीये की या महानगरपालीकेच्या निवडणुकीत अमरावतीमध्ये भाजपला पुर्ण बहुमत आहे.असं मुख्यमंत्री त्यांच्या भाषणादरम्यान म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती येथे जनतेला संबोधित करताना राज्य सरकार अमरावतीच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे ठामपणे सांगितले. पायाभूत सुविधा मजबूत करणे, नागरी सोयी-सुविधा सुधारणा आणि शहराच्या विकासाला गती देणे हे सरकारचे प्राधान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अमरावतीमध्ये रोजगारनिर्मितीला चालना देण्यासाठी आणि आर्थिक विकास वाढवण्यासाठी विविध योजना राबवण्यात येत असल्याचेही फडणवीसांनी नमूद केले. विकासाचा लाभ समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.सरकार पारदर्शक आणि लोकाभिमुख पद्धतीने काम करत राहील,असा विश्वास त्यांनी नागरिकांना दिला.
BMC Election | महानगरपालिका निवडणुकी दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा
Devendra Fadnavis | सरकार अमरावतीच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे
Shambhuraj Desai | शिवसेनेचा भगवा घेतल्याशिवाय सत्ता स्थापन होणं अशक्य
उद्धवमामूंचा महापौर झाला तर...; अमित साटम यांचा ठाकरेंना टोला

