Devendra Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीस यांची अबू आझमींवर सडकून टीका
CM Devendra Fadnavis News : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी वारी संदर्भात केलेल्या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा समाचार घेतला आहे.
मी त्यांना प्रसिद्धीच्या लायकीचं समजत नाही, असा थेट टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्या विधानावर केला आहे. वारीमुळे रस्ता जाम होतो, पण मुस्लीम समाज तक्रार करत नाही. पण मुसलमानांनी नमाज पठण केलं तर तक्रार केली जाते, असं आबू आझमी यांनी म्हंटलं आहे. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सडकून टीका केली आहे.
पत्रकारांनी अबू आझमी यांनी केलेल्या विधानाबाबत तुम्हाला काय वाटतं, असं विचारलं. यावर बोलताना, मला वाटतं की अबु आझमी यांना वादग्रस्त विधानं करण्याची आवड आहे. वादग्रस्त विधानं केली की प्रसिद्धी जास्त मिळते, असं त्यांना वाटतं. त्यामुळंच मी त्यांना प्रसिद्धीच्या लायक समजत नाही. त्यामुळेच मी या प्रश्नाचे उत्तर देणार नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीची प्रदेशाध्यक्षपदाची धुरा शशिकांत शिंदेंवर

भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण! अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर परतले

मनसेच्या शिबिरात युती बाबत राज ठाकरेंचं मोठं विधान

मुलींच्या शरीरावरून कमेंट्स; पोलीस भरती तयारी करणाऱ्यांना मारहाण अन्..
