महायुती 2.0... राज्यात आता फडणवीस 'सरकार', तिसऱ्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

महायुती 2.0… राज्यात आता फडणवीस ‘सरकार’, तिसऱ्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

| Updated on: Dec 06, 2024 | 12:45 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत शपथविधीचा ग्रँड सोहळा पार पडलाय.

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. ऐतिहासिक अशा मुंबईतील आझाद मैदानात हा भव्य शपथविधीचा सोहळा पार पडला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेत तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भव्य दिव्य शपथविधी सोहळ्यात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. याच शपथविधीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात फडणवीस पर्व सुरू झालंय. तब्बल ४० हजारांहून अधिक जणांच्या उपस्थितीत फडणवीस सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत शपथविधीचा ग्रँड सोहळा पार पडलाय. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीही शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपने निवडणूक लढवली आणि रेकॉर्डब्रेक १३२ भाजपचे आमदार निवडून आलेत. याच विजयाचे शिल्पकार राज्याचे मुख्यमंत्री झालेत.

Published on: Dec 06, 2024 12:45 PM