Air India : अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर DGCA ची सर्वात मोठी अॅक्शन, एअर इंडियाला मोठा धक्का
डीजीसीएने एअर इंडियाला विभागीय उपाध्यक्षांसह तीन अधिकाऱ्यांना क्रू शेड्युलिंग आणि रोस्टरिंगशी संबंधित सर्व भूमिका आणि जबाबदाऱ्यांमधून काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत.
एअर इंडियाच्या अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेनंतर सर्वात मोठी पहिली अॅक्शन घेण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. एअर इंडियाच्या तीन वरिष्ठांना काढून टाका, असे निर्देश डीजीसीए अर्थात नागरी विमान वाहतूक महासंचालकाकडून देण्यात आले आहे. क्रू शेड्यूलिंग आणि रोस्टरिंगशी संबंधित भूमिकांमधून मुक्त करा असं डीजीसीएने म्हटलंय.
अहमदाबाद अपघातानंतर, डीजीसीएने विमान वाहतूक सुरक्षेबाबत कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. डीजीसीएने आपल्या आदेशात असे म्हटले की, ARMS आणि सीएई फ्लाइट अँड क्रू मॅनेजमेंट सिस्टीमच्या तपासणीनंतर नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले आहे. या ऑपरेशनल त्रुटींसाठी थेट जबाबदार असलेल्या प्रमुख अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर निर्णय घेतला पाहिजे. हे अधिकारी वारंवार होणाऱ्या गंभीर चुकांमध्ये सहभागी आहेत. जर क्रू शेड्यूलिंगमध्ये भविष्यात उल्लंघन झालं तर परवाना रद्द करण्यात येईल आणि ऑपरेशनल बंदीसह कठोर कारवाई करण्यात येईल.

अरे आमची लाज काढू नका... भर सभागृहात शंभूराज देसाई संतापले अन्...

तुमच्यापेक्षा जास्त बोलता येत; सरकारची लाज काढली, गुलाबराव पाटील भडकले

'त्या' प्रकरणावरून दमानिया भडकल्या अन् सरकारला केली कळकळीची विनंती

डबल डेक्करला आग अन् प्रवाशांनी बसमधून घेतल्या उड्या, थरारक व्हिडीओ
