Dhananjay Munde : हे दळभद्री सरकार जास्त दिवस टिकणार नाही अन् लोकसभेचं त्यांचं स्वप्नही पूर्ण होणार नाही, मुंडेंचा टोला
बारामती, पुणे, पिंपरी चिंचवड या ठिकाणी तर भाजपाच्या कित्येक पिढ्या गेल्या तरी त्यांना अपेक्षित असलेला बदल होणार नाही. कारण या मतदारसंघात झालेली कामे बोलत आहेत, असे धनंजय मुंडे म्हणाले.
पुणे : राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात केंद्रीय मंत्री काय आणखी कोणी आले तर त्याचा फरक थेट मतदानावर होणार नसल्याचा विश्वास (Dhananjay Munde) माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे. शिवाय राज्य सरकार हेच अल्पावधीसाठीच आहे. नियम डावलून सत्तेत बसलेले हे सरकार अधिक काळ टिकणार नसल्याचेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. ज्या विभागात गेल्या 20 ते 25 वर्षापासून राष्ट्रवादी कॉंग्रसने (NCP) जनतेची सेवा केली आहे, त्या बालेकिल्ल्यात बदल हा सहज शक्य राहणार नाही. बारामती, पुणे, पिंपरी चिंचवड या ठिकाणी तर भाजपाच्या कित्येक पिढ्या गेल्या तरी त्यांना अपेक्षित असलेला बदल होणार नाही. कारण या मतदारसंघात झालेली कामे बोलत आहेत. बारामती (Baramati) मतदारसंघामध्ये यापूर्वीच भाजपाचे डिपॉझिट जप्त झाले होते. त्याचा विसर त्यांना पडला असेल, असा टोलाही धनंजय मुंडे यांनी लगावला आहे.
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी

