AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur | बागेश्वर बाबाने मागितली पुन्हा एकदा शिवप्रेमींची माफी, आता म्हणाले…

Nagpur | बागेश्वर बाबाने मागितली पुन्हा एकदा शिवप्रेमींची माफी, आता म्हणाले…

| Updated on: Apr 28, 2026 | 9:55 AM
Share

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आलेले बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी अखेर सार्वजनिकरित्या माफी मागितली आहे. त्यांच्या वक्तव्यावर महाराष्ट्रासह देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. नागपूर येथे आयोजित राम कथा कार्यक्रमादरम्यान त्यांनी मंचावरून महाराष्ट्रातील जनतेची आणि शिवप्रेमींची माफी मागितली. “माझ्या वक्तव्याचा गैरसमज झाला. माझ्या शब्दांमुळे कोणाला दु:ख झालं असेल, तर मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो,” असे ते म्हणाले.

यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आपला आदर व्यक्त करत, “मी देखील शिवाजी महाराजांना मानतो,” असे स्पष्ट केले. तसेच, समाजात मतभेद वाढवण्याऐवजी एकात्मता राखण्याचे आवाहन त्यांनी केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या वक्तव्याचा अर्थ चुकीचा लावला गेला, असे सांगत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “आमचा उद्देश समाजात फूट पाडण्याचा नाही, तर लोकांना एकत्र आणण्याचा आहे,” असेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यावरून निर्माण झालेला वाद काहीसा शमण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Published on: Apr 28, 2026 09:55 AM
Follow Us