भोयरे गावात दगडफेक करत धुळवड साजरी
धुळवड ही रंगाची उधळन करून साजरी करण्यात येते. मात्र सोलापुर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील भोयरे या गावात चक्क दगड गोट्याच्या वर्षावात होळी खेळली जाते.
सोलापूर: धुळवड ही रंगाची उधळन करून साजरी करण्यात येते. मात्र सोलापुर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील भोयरे या गावात चक्क रक्ताची धुळवड खेळली जाते. हे ऐकून आश्चर्य वाटतंय ना? मात्र हे खरं आहे. मोहोळमधील भोयरे गावाची दोन गटामध्ये एकमेकांवर दगडफेक करत धुळवड खेळण्याची परंपरा आहे. गावातील एक गट भवानी देवीच्या मंदिरावर थांबतो आणि दुसरा गट मंदिराच्या पायथ्याशी थांबतो. शिमग्याच्या दुसऱ्या दिवशी धुळीवडीला दिवसभर येथील तरुण दगड-गोटे जमा करतात आणि संध्याकाळी त्याच दगडांनी एकमेकावर हल्लाबोल करून धुळवड साजरी करतात. एकमेकांवर दगडांचा तुफान वर्षाव केला जातो. यामध्ये अनेक तरुण जखमी होतात. मात्र हे जखमी लोक दवाखान्यात किंवा डॉक्टरकडे न जाता देवीच्या अर्शीवादाने निट होतात अशी या प्रथेची अख्यायिका आहे.
Latest Videos
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव

