संजय राठोड, अब्दुल सत्तारांना मंत्रीपद देण्यास भाजपचा विरोध होता?
संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांना मंत्रिपद देण्यास भाजपचा विरोध होता, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. दिपक केसरकर यांनाही मंत्रिपद देण्यास भाजपचा विरोध होता, अशी माहिती समोर येत आहे.
संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांना मंत्रिपद देण्यास भाजपचा विरोध होता, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. दिपक केसरकर यांनाही मंत्रिपद देण्यास भाजपचा विरोध होता, अशी माहिती समोर येत आहे. भाजपचा विरोध डावलून राठोड आणि सत्तार यांना शिंदेंनी मंत्रिपदं दिली अशी माहिती सूत्रांकडून कळतेय. आमची यादी आम्हाला ठरवू द्या, शिंदेंनी भाजपला ठणकावल्याचीही माहिती मिळतेय. मंत्रिमंडळ विस्तारात संधी न मिळाल्याने शिंदे गटातील अनेक आमदार नाराज झाले असून धुसफूस सुरू झाली आहे. मी दिलेला शब्द पाळणार आहे, थोडं सबुरीनं घ्या, असं आवाहन करत नाराजांना शांत करण्याची कसरत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करावी लागली.
Published on: Aug 10, 2022 01:57 PM
Latest Videos
दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!

