आज त्यांना रायगड आठवला ? राज ठाकरे यांची शरद पवारांवर टीका
मनसेने लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांसाठी चाचपणी सुरु केली आहे. शाखा अध्यक्षांच्या बैठका झाल्या आहेत. आता ठाणे, कल्याण, भिवंडी या ठिकाणच्या बैठका झाल्या आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांसंदर्भात उमेदवारांची चाचपणी सुरु आहेत अजून काही ठरले नसल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले.
मुंबई | 24 फेब्रुवारी 2024 : कधीही छत्रपतीचं नाव न घेणारे आमचे शरद पवार यांना आता त्यांना रायगड आठवला आहे. त्यांना शिवाजी महाराजाचं नाव घेतली की मुस्लीमांची मते जातील अशी भीती इतकी वर्षे वाटत होती. आता त्यांना शिवाजी महाराज आठवत आहे. मागे मी पवारांची मुलाखत घेतली होती तेव्हाही त्यांना मी विचारले होत की तुम्ही नेहमी शाहु, फुले आणि आंबेडकराचं नाव घेता, शिवाजी महाराजाचं नाव का घेत नाही असा सवाल केला होता याची आठवण त्यांनी यावेळी करुन दिली. राजकारणाचा इतका चिखल यापूर्वी कधी झाला नव्हता. आता कोण कोणत्या पक्षात आहे हेच कळत नसल्याचेही राज ठाकरे यांनी सांगितले. आपण एखाद्या समवेत व्यासपीठ शेअर केले म्हणजे आमची युती झाली असे होत नाही असेही ठाकरे म्हणाले.
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया

