Dilip Walse Patil | संजय राठोड प्रकरणी क्लिनचीट देण्याचा संबंधच नाही – दिलीप वळसे – पाटील

मराठा आरक्षणाबाबत दोन अडचणी आहेत, एक म्हणजे कायदा करण्याचा अधिकार केंद्राकडे आहे आणि दुसरं आरक्षणाची 50 टक्के मर्यादा आहे. केंद्र जर कायदा करत असेल तर स्वागतच आहे.

पुणे : संजय राठोड प्रकरणी पुणे पोलीस तपास करत आहेत. त्यामुळे क्लिन चिट देण्याचा संबंधच नाही. पटोले याच्या वक्तव्यातून गैरसमज होत आहे. त्यामुळे नेत्यांनी जपून वक्तव्य करावी, असा सल्ला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिला. मराठा आरक्षणाबाबत दोन अडचणी आहेत, एक म्हणजे कायदा करण्याचा अधिकार केंद्राकडे आहे आणि दुसरं आरक्षणाची 50 टक्के मर्यादा आहे. केंद्र जर कायदा करत असेल तर स्वागतच आहे. विधानसभा अध्यक्षाबाबत आमच्याकडे बहुमत आहे त्यामुळे घाबरायचे कारण नाही, असेही दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI