कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना घरूनच शिक्षण घ्यावे लागत आहे. अत्यंत दुर्गम भागात वसलेल्या या गावाच्या जवळच्या परिसरात नेटवर्क टॉवर नसल्यामुळे गावात मोबाइलला रेंज मिळत नव्हती. गावातच नेटवर्क नसल्यामुळे घरात मोबाईलला नेटवर्क मिळण्याचा प्रश्नच नव्हता पर्यायाने विद्यार्थी ऑनलाईन अध्ययन करु शकत नव्हते. यावर मात करण्यासाठी गावातील संदीप अवगण यांनी घराच्या छतावर स्टिलच्या दोन प्लेट लाकडी बांबुत लावल्या. स्टिल प्लेटला डिश टीव्हीचा वायर जोडून तो घरात मोबाईलजवळ लावला. आश्चर्य म्हणजे शून्य नेटवर्क असलेल्या त्यांच्या घरात या कल्पनेने पूर्ण नेटवर्क आल्याचे दिसून आले.