Sujay Vikhe Patil : शिर्डीत राजकारण तापलं.. आई मला दादांनी मारलं, दादाचं वाक्य खरं ठरलं, ‘त्या’ बॅनरची चर्चा
सुजय विखे पाटील यांचा फोटो असलेले फलक लागल्याने शिर्डीत राजकारण तापलं असून शिर्डीतील आगामी राजकारणात नव्या समिकरणांची चाहूल लागल्याचे संकेत आहेत.
शिर्डीत ‘ पाटी फुटली ‘ बॅनर लागले , नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणावरून शिर्डीत राजकीय फटाके फुटत असल्याचे पाहायला मिळत आहे. अनुसूचित जाती महिलाआरक्षण जाहीर झाल्याने अनेक दिग्गजांच्या आकांक्षा भुईसपाट झाल्यात. अशातच “शाळा सुटली पाटी फुटली” , “आई मला दादांनी मारलं” ; “आई दादाचं वाक्य खरं ठरलं”, अशा बॅनरची शिर्डीत चर्चा सुरू झाली आहे. डॉ. सुजय विखे शिर्डीला पायी चालत येणार असून माजी प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते यांनी शिर्डीत त्यांच्या स्वागताचा बोर्ड लावला आहे. सुजय विखेंचे स्वागत की सुचक राजकीय संदेश..? शिर्डी शहरात चर्चेला उधाण आलंय.
Published on: Oct 07, 2025 02:01 PM
Latest Videos
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन

